अयोध्येतील भव्य राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. २०२५ची सुरुवात झाल्यापासून तर भाविकांचा आणि पर्यटकांचा महासागर अयोध्येत लोटला आहे. एकीकडे १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले साधु-संत-महंत तसेच भाविक, पर्यटक अयोध्येला जाऊन रामलला चरणी नतमस्तक होत आहेत. गेल्या ३० तासांत २५ लाख भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.
त्यामुळे मंदिर ट्रस्ट वाल्यांनी भाविकांना आवाहन केले आहे की किमान दहा ते पंधरा दिवस भाविकांनी मंदिराकडे येऊ नका. एवढी मोठी प्रचंड गर्दी अजूनही भाविक आणि पर्यटकांचे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून ट्रस्टच्या प्रमुखांनी हे आवाहन केले आहे.