Bhandara Accident : भंडाऱ्यात आयुध निर्माण फॅक्टरीत भीषण स्फोट, पाच जणांचा मृत्यू, भंडाऱ्यामधील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारखान्याच्या आर, के ब्रँचमध्ये हा स्फोट झाला असून यात संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली आहे.
भंडाऱ्यामधील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारखान्याच्या आर, के ब्रँचमध्ये हा स्फोट झाला असून यात संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली आहे. मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, याचा आवाज पाच ते सात किलोमीटरपर्यंत एकू गेला. असे स्थानिकांनी सांगितले.
या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास पाच ते सात किलोमीटरपर्यंत गेला. यामुळे नागरिकांमद्ये घबराट निर्माण झाल्याने ते रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.