Bill gates:मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना सतर्क केले.चार वर्षात जगभरात कोरोनासारखी आणखी एखादी मोठी साथ येण्याची १० ते १५ टक्के शक्यता आहे, असा दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केला. एका अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
साथी, तसेच विविध आजारांना रोखण्यासाठी कशा प्रकारचे जागतिक आरोग्य धोरण असावे याविषयीची आपली मते गेट्स यांनी मांडली.
ते म्हणाले की, संकटांना तोंड देण्यासाठी अधिक पूर्वतयारी केली पाहिजे. पण, भविष्याचा विचार करून लोकांनी तशी तयारी केलेली दिसत नाही. कोरोनासारखी भीषण साथ भविष्यात येऊ शकते.
२०१५ मध्येही केले भाकीत आणि ते खरे ठरले
जगात पसरणाऱ्या साथी व त्यापासून मानवी जीवनाला असलेला धोका, याबाबत बिल गेट्स गेल्या अनेक वर्षांपासून लोकजागृती करत आहेत. २०१५ साली टेड टॉक या कार्यक्रमात गेटस यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, प्राणघातक साथीचा मुकाबला करण्यासाठी जगाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही.
कोरोनासारखी एखादी प्राणघातक साथ पुन्हा पसरली, तर तिला रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सध्यातरी जगातील कोणत्याही देशाकडे दिसत नाही. ही वस्तुस्थिती बिल ग्रेटस यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तीला दिसत असल्याने ते यासंदर्भात सर्वांना सतर्क करण्याचे काम करत आहेत.
गेटस • यांनी अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जागतिक सहकार्य व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे साथींवर नियंत्रण मिळविणे कठीण जाते.
आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबद्दल जगातील सर्व देशांनी
एकमताने निर्णय घेतला व त्या साधनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले तर अनेक अडचणी दूर करता येतील.
मात्र तसे न होता पूर्वी केलेल्या चुकांची 3 अनेक देश पुनरावृत्ती करत आहेत असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी सांगितले.