Fussclass Dabhade Box Office Colletion: मराठी अभिनयाने सजलेला ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. तीन दिवसात या चित्रपटाने किती कमाई केलीये?
पहिल्या तीन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलंय असं म्हणायला हरकत नाही. पाहूया या चित्रपटाने तीन दिवसात किती कमाई केलीये.
फसक्लास दाभाडे’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. हा या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी चौथा मराठी चित्रपट आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगली कमाई केलीये.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ या आगळ्या वेगळ्या कौटुंबिक चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. आता हा चित्रपट त्या अपेक्षांवर खरा उतरलाय. एक तुमच्या आमच्या सारखं कुटुंब प्रेक्षकांना ‘फसक्लास दाभाडे’ मध्ये पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये हसतं- खेळतं दाभाडे कुटुंब दिसत असून भावंडांमधील भांडणे, कुरबुरी यात दिसत होत्या. काही दिवसांपूर्वीच या चित्रपाटातील ‘तोड साखळी’ हे गाणं प्रदर्शित झालं. आता या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात किती कमाई केली ते पाहूया.
चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळे अवघ्या ३ दिवसात चित्रपटाने एकूण १ कोटी ४९ कोटींची कमाई केलीये.
पहिल्या दिवशी भारतात २८ लाखांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४९ कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवसही म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईत दुप्पट वाढ दिसून आली. रविवारी या चित्रपटाने ७२ कोटींची कमाई केली.सॅकनिक या साइटने दिलेल्या माहितीनुसार.यापूर्वीच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यातही परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही