Breaking
4 Apr 2025, Fri

4.8 कोटी वाया ! जसप्रीत बुमराहनंतर आता Mumbai Indians चा गोलंदाजही champions trophy 2025मुकणार

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून मुंबई इंडियन्सच्या युवा फिरकीपटूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.

Mumbai Indians Young Bowler Ruled Out :

अफगाणिस्तानचा उदयोन्मुख गोलंदाज अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने IPL 2025 च्या लिलावात खरेदी केले. वेगवान गोलंदाजांवर कायम विश्वास दाखवणाऱ्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने युवा फिरकीपटूला ४.८ कोटींमध्ये संघात सामील केले. पण १८ वर्षीय गोलंदाज आयपीएल खेळणार की नाही याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गझनफरला मणक्याच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

युवा फलंदाज गझनफरची अफागाणिस्तानच्या तात्पुरत्या संघात निवड करण्यात आली होती. पण स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानच्या संघात बदल करण्यात आला असून फिरकीपटूला संघाबाहेर करण्यात आले आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार मणक्याच्या दुखापतीमुळे युवा गोलंदाज अल्लाह गझनफरला संघातून बाहेर करण्यात आले आहे. गझनफर बदल्यात राखीव संघातील नांग्याल खरोतीला मुख्य संघात संधी देण्यात आली आहे.

गझनफरने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत उल्लेखनिय कामगिरी केली. तीन सामन्यांच्या मालितकेत एकूण ९ विकेट्स घेतले. ज्यामध्ये त्याने ३३ धावांत फायफर (५ विकेट्स) पुर्ण केला व झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १२७ धावांवर गुंडाळला. ती मालिका ऑस्ट्रेलियाने २-० ने जिंकली. त्याचबरोबर गझफरने इमर्जिंग आशिया कपमध्ये विशेषतः भारताविरूद्ध त्याने उत्तम कामगिरी केली होती.

Afghanistan Team For Champions Trophy 2025:

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झाद्रान, रेहनुल्लाह गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रेहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नाईब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खारोती, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झाद्रान.

राखीव खेळाडू – दार्विश रसुली, बिलाल सामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *