Breaking
12 Apr 2025, Sat

Chhava Movie : तीन ठिकाणी पायाला गंभीर फॅक्चर असूनही रश्मिका चुकवत नाहीये प्रोमोशन

Chhava movie

Chhaava Promotion After Injury : अभिनेत्री रश्मिक मंदानाने गंभीररित्या जखमी असूनही छावा सिनेमाचा ट्रेलर आणि इतर प्रोमोशन का चुकवत नाहीये याचं कारण सांगितलं.Chhava movie

: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती विकी कौशलच्या छावा या सिनेमाची. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाविषयी गेला बराच काळ चर्चा सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर लाँचला या सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाची हजेरीही चर्चेत राहिली. पाय फॅक्चर झाला असतानाही ट्रेलर लाँचला हजर राहणाऱ्या रश्मिकाचं कौतुक होतंय.

रश्मिकाने छावाच्या ट्रेलर लाँचचे बिहाइंड द सीन व्हिडीओ आणि तिच्या पायाच्या एक्स रे आणि रिपोर्टचे फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या. ती इतकी जखमी असूनही तिने या सिनेमाचं प्रोमोशन का केलं याचं कारण तिने सांगितलं. तिची ही पोस्ट व्हायरल होतेय.

त्रास होत असतानाही रश्मिकाने ट्रेलर लाँचला हजेरी लावली आणि सिनेमाचे प्रोमोशनही ती मिस करणार नसल्याची चर्चा आहे. पण यामागचं कारण तिने नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलं. यामुळेच सध्या सगळेजण तिचं कौतुक करत आहेत.

तिने पोस्टमध्ये म्हटलं, “माझं सध्याचं आयुष्य. छावाचं प्रोमोशन – महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्याबद्दल मला खूप गौरवास्पद, धन्य आणि कृतज्ञ वाटले. त्या त्यांची वेदना त्यांच्या जवळच्या लोकांनाही दाखवायच्या नाहीत आणि मीही दाखवणार नाही. म्हणून, मी नेहमीप्रमाणे हसत आहे. माझ्या टीमने त्यावर चित्र काढलं आहे पण या पट्टीच्या आतमध्ये 3 फॅक्चर आणि एक स्नायू फाटला आहे जे अजिबात चांगलं नाहीये. गेल्या 2 आठवड्यांत माझा पाय खाली ठेवला नाही -मी खरोखरच माझ्या स्वतःच्या दोन पायांवर उभं राहणं मिस करतेय.”

Chhaava Controversy: धमाकेदार ट्रेलरच्या चर्चेनंतर ‘छावा’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *