Breaking
4 Apr 2025, Fri

गो-तस्करी करणाऱ्यांना भरचौकात गोळी मारली जाईल, मंत्र्याचं विधान

Cow

Karnataka minister Mankar vaidya : गो

तस्करीत सहभागी असल्याचं आढळल्यास आरोपींना भरचौकात किंवा रस्त्यावर गोळी मारली जाईल असं मंत्री मनकल वैद्य म्हणालेत.Cow

कर्नाटकात उत्तर कन्नड जिल्ह्यात गायींच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. याच पार्श्वभूमीवर प्रभारी मंत्री मनकल वैद्य यांनी मोठं विधान केलंय. गो तस्करीत सहभागी असल्याचं आढळल्यास आरोपींना भरचौकात किंवा रस्त्यावर गोळी मारली जाईल असं मंत्री मनकल वैद्य म्हणालेत. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना होऊ देणार नाही. प्रशासन गायी आणि गोपालकांच्या हितांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत असल्याचंही वैद्य म्हणाले. होन्नावर इथं एका गर्भवतीय गायीच्या बळीच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

गोतस्करीच्या घटना होत राहिल्या तर मला असं केलं नाही पाहिजे, पण आरोपींना भरचौकात किंवा रस्त्यावर गोळी मारली जावी. काम करा, कमवा, खा. रोजगाराच्या अनेक संधी आहेत. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत गो तस्करी करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही अशा शब्दात मंत्री मनकर वैद्य यांनी इशारा दिला.

पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, जे कुणी या गुन्ह्यात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. काही प्रकरणांमध्ये अटकेची कारवाईसुद्धा झाली असल्याची माहिती मंत्री वैद्य यांनी दिली.

प्रभारी मंत्री वैद्य म्हणाले की, गायींच्या चोरीच्या घटना वर्षानुवर्षे होत आहेत. मी पोलीस अधीक्षकांना या घटना रोखल्या पाहिजेत असं म्हटलं. अशा घटना चुकीच्या आहेत. आपण गायीची पूजा करतो. या प्राण्यांना प्रेमाने पाळतो. याच गायीचं दूध पिऊन मोठे झलोय.

मंत्री मनकर वैद्य म्हणाले की, अशा घटना आधीही घडल्या आहेत. भाजप सत्तेत असताना असे प्रकार समोर आले होते. गो तस्करीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं जातंय यावरून विरोधकांवर मंत्री मनकर यांनी निशाणा साधला. सत्तेत असताना तुम्ही मौन बाळगलंत असंही मंत्री वैद्य म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *