Delhi elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे समन्वयक arvind kejriwal यांनी भाजपवर कार्यकर्त्यांवर आणि महिलांवर हल्ले करण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, डबल इंजिन सरकार आलं तर ते सर्वांना चिरडून टाकेल.
नवी दिल्ली:जनतेसमोर चांगल्या लोकांचा पक्ष आणि गुंड लोकांचा पक्ष असे दोन पर्याय आहेत. त्यामुळे लोकांनी सारासार विचार करून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
“दिल्लीत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया
सुरू असताना आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. महिला कार्यकर्त्यादेखील यातून सुटलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी जर डबल इंजिनचे सरकार सत्तेत आले तर हे डबल इंजिन सर्वांना चिरडून टाकणार आहे,” असा आरोप ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
देशाच्या राजधानीत गुंडगिरी सुरू असून विरोधी पक्षांना भीती घालण्यासाठी तोडफोड केली जात आहे. देशातला सर्वात मोठा गुंड कोण? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे,” असा आरोप केजरीवाल यांनी केला. आप कार्यकर्त्यांवर मागील काही काळापासून हल्ले सुरू आहेत. जनतेला धमक्या दिल्या जात आहेत. डोळ्यांसमोर सर्वकाही घडत असूनही पोलिस गप्प आहेत. असा कोणता गुंड आहे की ज्याला पोलिस घाबरत आहेत? अलीकडेच सात पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. काहींची डोकी फोडण्यात आली तर काहींना अटक करण्यात आली. हे सर्व संसदेच्या एक किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात घडत आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.त्यांना कोणती ऑफर आहे?’
देशात निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, यासाठी लोकांनी बलिदान दिले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना अशा कोणत्या पदाची ऑफर देण्यात आली आहे, की ते गप्प बसले आहेत? लोकशाही शाबूत राहावी, यासाठी राजीव कुमार यांनी पदाचा लोभ सोडावा, असे केजरीवाल म्हणाले.
…तर ‘आप’ला ६०हून अधिक जागा
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला ५५ जागांवर विजय मिळेल असा दावा केजरीवाल यांनी समाज माध्यमातून केला आहे. “महिलांनी जर घरातील पुरुषांना ‘आप’ला मतदान करण्यासाठी आग्रह केला तर आप ६० पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा दावा केजरीवालांनी केला आहे.