Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला असून अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीधनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे
Dhananjay Munde on resignation : बीड प्रकरणात
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला असून अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आता धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयात बैठकीसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे म्हणाले की, अंजली दमानिया या अजित पवारांना भेटल्या आहेत, त्यांनी कागदपत्रे दिली आहेत, मात्र माझ्या राजीनाम्याची अजून कोणी मागणी केलेली नाही.
परळीतील राखेच्या अर्थकारणावरुन धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले की या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा 2026 चा जर जीआर पाहिला तर त्यात असे म्हटले आहे की, थर्मल पावरची राख ही कचरा आहे आणि तो त्यांनी स्वतः पैसे खर्च करुन उचलला पाहिजे. महानिर्मिती हे सरकारशी संबंधित नाही त्यामुळे या प्रॉफिट ऑफ बिझनेस असं कुठे येत नाही. असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
धनंजय मुंडे म्हणाले की, राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील, त्यांनीच उत्तर द्यावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. दरम्यान माध्यमांशी संवाद साधल्यानंतर धनजय मुंडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी पहिल्या दिवसापासूनच मागणी केली आहे. माध्यमांनी ही बातम्या संतुलन राखून दिल्या पाहिजेत. गेल्या एक महिन्यापासून बीडशिवाय दुसऱ्या बातम्या माध्यमांत दिसत नाही. माध्यमांनी मीडिया ट्रायल जरुर करावी, जर त्यात कोणी मतदार संघातील नेता असेल किंवा मी जरी दोषी असलो तरी मीडिया ट्रायल झाले पाहिजे. या मताचा मी आहे. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन फासावर नेले पाहिजे या माझ्या भूमिकेत आजही कसलाही बदल नाही. असे मुंडे म्हणाले.