काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन ? जाणून घ्या
Donald Trump On Income Tax: अमेरिकेत इन्कम टॅक्स रद्द होऊ शकतो. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इन्कम टॅक्स काढून टाकून त्याऐवजी शुल्क आकारण्याचे वक्तव्य केले आहे.
27 जानेवारी रोजी फ्लोरिडा येथे 2025 च्या रिपब्लिकन इश्यूज कॉन्फरन्समध्ये ट्रम्प यांनी सांगितले की, आम्हाला श्रीमंत आणि शक्तिशाली बनवणाऱ्या व्यवस्थेकडे परत जाण्याची वेळ आली आहे. परदेशी नागरिकांवर शुल्क आणि कर लादून अमेरिका आपली समृद्धी वाढवू शकते, असे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेत इन्कम
टक्स रद्द होऊ शकतो. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इन्कम टॅक्स काढून टाकून त्याऐवजी टॅरिफ शुल्क आकारण्याचे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्यासोबतच अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनीही इन्कम टॅक्स रद्द केला पाहिजे असे सांगितले आहे.
ट्रम्प म्हणाले, अमेरिका लवकरच खूप श्रीमंत होणार आहे. 1913 पूर्वी अमेरिकेत इन्कम टॅक्स आणि टॅरिफ नियमांनी आम्हाला समृद्ध केले. त्यांनी दावा केला की, अमेरिकेने 1870-1913 दरम्यान टॅरिफमुळे सर्वात श्रीमंत काळ पाहिला1887 च्या “ग्रेट टॅरिफ कमिशन” चा संदर्भ देत ते म्हणाले, त्यावेळी अमेरिका इतकी श्रीमंत होती की हा पैसा कसा वापरायचा हे ठरवण्यासाठी सरकारला एक आयोग तयार करावा लागला.
आपण परदेशी राष्ट्रांवर शुल्क आणि कर लादून आपल्याच नागरिकांना समृद्ध केले पाहिजे. अमेरिकेने परदेशी उत्पादनांवर शुल्क लादून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी यावर त्यांनी भर दिला.