- भारत पाटणकर:देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यात विकासाचे अनेक प्रकल्प राबविण्यात आले. यासाठी हजारो कुटुंबांच्या जमिनी घेण्यात आल्या. मात्र आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हजारो कुटुंबे न्यायाच्या – प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पग्रस्तांवर – अन्याय सुरूच आहे, अशी टीका श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.
शिरसगाव (ता. कडेगाव) येथील – गायरान जमिनीत सौर प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध आहे. प्रजासत्ताकदिनी या जागेवर डॉ. भारत पाटणकर, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, शिरसगाव येथील गायरान जमिनीत कागदपत्रांमध्ये फेरफार करून सौर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यायी जागा असताना भांडवलदारांच्या घशात फुकटात जागा घालण्याचा हा प्रकार आहे. पठारावरसूर्याचा प्रकाशही चांगला मिळू शकतो, तसेच जागाही भाडेपट्ट्यावर मिळू शकते. मग याच जागेचा अट्टाहास का आहे? यावेळी प्रा. मच्छिंद्र सकटे यांनीही गावातील दलित समाजाची जागा त्यांना परत मिळावी, अशी मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.