-
-
- GBS:पाण्याच्या तपासणीचा अहवाल पालिकेला प्राप्त; न्यूरोलॉजिस्ट म्हणतात दूषित पाण्याने जीबीएस
-
जीबीएस आजार ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. हा आजार दूषित पाणी व अन्नामुळे होऊ शकतो. या संसर्गामुळे जुलाब, पोटदुखी यासारखी लक्षणेदेखील होऊ शकतात. मात्र योग्य उपचारांनी हा बरा होऊ शकतो.
डॉ. परेश बाबेल, न्यूरोलॉजिस्ट
: शहरातील सर्वाधिक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या तपासणीचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. त्यात या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या अहवालामुळे नागरिकांना काहीसा दिला मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांनी मात्र, हा आजार दूषित पाणी व अन्नामुळे होत असल्याचा दावा केल्याने नागरिकांच्या मनातील संशय कल्लोळ बळावला आहे. महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे प्रत्येकी १०० मिलिलिटर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या विहिरीत सोडलेल्या खडकवासच्या पाण्यात
कोलीफॉर्म्स, थरमोटॉलरंट आणि ई
कोलाय हे जिवाणू आढळून आले.
शासनाच्या अहवालानुसार मनपा पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचे नमूद केले आहे. २७ ठिकाणांचे पाणी पिण्यास योग्य असल्याचेही प्रयोगशाळेने कळविले आहे.GBS Gullain barre syndrome:GBS रुग्णांची संख्या वाढली, आकडा 101 वर पोहोचला