Breaking
4 Apr 2025, Fri

Gold Purity: सोनं खर आहे की खोटं तुम्ही घरबसल्या तपासू शकता; जाणून घ्या काय आहे प्रोसेस ?

Gold rate today

How To Check Gold Purity: लग्नाचा हंगाम जवळ

आला आहे. अनेकांच्या घरात सोन्याची खरेदी सुरू आहे. मात्र, त्यांनी खरेदी केलेले दागिने खरे की बनावट, हा प्रश्न अनेकदा पडला असेल. भारतीय मानक ब्युरोने एक अॅप सुरू केले आहे.
ज्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहीत नाही.सोने खरेदीदार भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या ‘BIS केअर अॅप’ची मदत घेऊ शकतात. हे अॅप तुम्हाला सर्व ISI आणि हॉलमार्क-प्रमाणित सोन्या-चांदीच्या दागिन्यांची माहिती देण्यास मदत करेल.

सध्या सोन्याचा दर 85 हजार रुपयांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते सोने खरे की खोटे कसे ओळखायचे हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

सोनं खर आहे की खोट कसं तपासायच?

बीआयएस केअर अॅपद्वारे, युजर्स हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकतात. हे अॅप अँड्रॉइड आणि ऍपल आयफोन युजर्ससाठी Google Play Store आणि Apple App Store वरून डाउनलोड करता येऊ शकते. BIS वेबसाइट FAQ नुसार, सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग 6 श्रेणींमध्ये केली जाऊ ते. ज्यात 14K, 18K, 20K, 22K, 23K आणि 24K समावेश आहे.

या अॅपद्वारे, वस्तूवर ISI मार्क, हॉलमार्क आणि CRS नोंदणी आहे का हे तपासता येते. फक्त उत्पादनावर दाखवलेला परवाना क्रमांक/HUID क्रमांक/नोंदणी क्रमांक लिहा आणि तुम्हाला सोने कोणी बनवले आहे याचे नाव आणि पत्ता, परवाना किंवा नोंदणी यासारखे सर्व तपशील मिळतील.

BIS केअर अॅप कसे वापरावे ?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अॅप डाउनलोड करून नोंदणी करावी लागेल. तुमचे काम आयएसआय आणि हॉलमार्कच्या माध्यमातून होईल. Verify License Details वर क्लिक करा.
हॉलमार्क केलेल्या दागिन्यांच्या वस्तू HUID क्रमांकाने ओळखल्या जाऊ शकतात. HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. तुमच्या बिलावर सहा अंकी HUID कोड लिहिणे आवश्यक नाही. तुम्ही ज्या स्टोअरमधून खरेदी करत आहात तिथून तुम्हाला या कोडबद्दल माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *