Gullain barre syndrome: मोठी बातमी! GBS चा पहिला बळी, पुण्यात तरूणाचा मृत्यू
पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव वाढत असून, एका तरुणाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. अनेक रुग्ण आढळले आहेत, काहींची प्रकृती गंभीर आहे. GBS हा दुर्मिळ आजार असून, त्याचे लक्षणे म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. पुणे महापालिका अलर्टवर आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS चे बरेच रुग्ण आढळले असून त्यांची संख्याही वाढली आहे. त्याचदरम्यान गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हळूहळू या संक्रमानाची वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस लोकं संक्रमण होत आहेत.