Gokul Shirgaon Police : एका महिलेशी प्रेमसंबंधाच्या (Love Affair) संशयावरून श्रीनाथ बाप्पा मेलकेरी (वय २७) याच्यावर येथे मंगळवारी रात्री खुनी हल्ला झाला.पोटात भोसकला चाकू, रक्ताच्या थारोळ्यात श्रीनाथ पडला अन्…
शुभमने चाकूने श्रीनाथच्या पोटात भोसकले. तो खाली पडला असताना त्याच्या चेहऱ्यावर, मानेवरही वार करण्यात आले. श्रीनाथ आरडाओरडा करू लागल्याने त्याची आई धावत आली. त्यांना पाहून हल्लेखोर पसार झाले.
गोकुळ शिरगाव : एका महिलेशी प्रेमसंबंधाच्या (Love
Affair) संशयावरून श्रीनाथ बाप्पा मेलकेरी (वय २७) याच्यावर येथे मंगळवारी रात्री खुनी हल्ला झाला. धारदार चाकूने त्याच्या पोटात भोसकण्यात आले असून, मानेवरही खोलवर वार आहेत.
त्यात श्रीनाथ गंभीर जखमी झाला आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी (Gokul Shirgaon Police) संशयित शुभम झाडे साहिल वाघमारे या दोघांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मेलकेरी कुटुंबीय मूळचे बेळगाव जिल्ह्यातील असून, श्रीनाथ आई-वडिलांसोबत राहतो. सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) असलेला श्रीनाथ एका कंपनीसाठी घरातूनच काम करीत होता. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय शुभम झाडे व साहिल वाघमारे यांना होता.
पंधरा दिवसांपूर्वी संबंधित महिलेच्या माहेरच्या लोकांनीही श्रीनाथला बोलावून समज दिली होती.तो मंगळवारी रात्री घराजवळील चौकात मोबाईलवर बोलत थांबला असताना शुभम व साहिल तेथे आले. त्यांनी त्याला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुभमने चाकूने श्रीनाथच्या पोटात भोसकले. तो खाली पडला असताना त्याच्या चेहऱ्यावर, मानेवरही वार करण्यात आले. श्रीनाथ आरडाओरडा करू लागल्याने त्याची आई धावत आली. त्यांना पाहून हल्लेखोर पसार झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीनाथला रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत मेलकेरी याची आई सावित्री बसाप्पा मेलकेरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक तब्बसूम मगदूम तपास करीत आहेत.