Karad :येथे सुरू असलेल्या mahakumbh 2025 दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी – बनारस- हुबळी अशी विशेष गाडी सुरू केली आहे. ही रेल्वे मिरजमधून १४, २१ व २८ फेब्रुवारीला दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी हुबळी-बनारस-हुबळी अशी धावेल.
ही रेल्वे किर्लोस्करवाडी येथून दुपारी अडीच, कराड मधून दुपारी तीन, सातारा येथून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी निघेल. प्रयागराज येथे दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता पोचेल, अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी दिली.
श्री. तिवारी म्हणाले, mahakumbh 2025 रेल्वेंची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य वारी, कोल्हापूरचे शिवनाथ बियानी, साताऱ्याचे अॅड. विनीत पाटील यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी झोनमध्ये महाकुंभमेळ्यासाठी विशेष गाडीची मागणी करून गाडी मंजूर करून घेतली.
त्याचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने तीन वेगवेगळ्या दिवशी या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभघ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संस्था, मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मधुकर साळुंखे, वाय. सी. कुलकर्णी, पंडितराव कराडे, श्रीकांत माने, जयगौंड कोरे, पांडुरंग लोहार यांनी केले आहे.
असा असेल परतीचा प्रवास
परतीच्या प्रवासासाठी प्रयागराज येथून १७, २४ फेब्रुवारी, तसेच तीन मार्चला सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी गाडी तेथून निघेल. मिरज जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून ४० मिनिटांनी पोचेल. या गाडीस सांगली, किर्लोस्करवाडी, कऱ्हाड व सातारा या ठिकाणी थांबा दिला आहे.