लाभ मिळण्यास होणार सुरुवात
लाडकी बहीण योजनेंतर्गत • जानेवारी महिन्याचे पैसे
महिलांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. पैसे २५ जानेवारीपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील. यादृष्टीने महिला व बालविकास विभागाच्या सचिव स्तरावरून २ हालचाली सुरू आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचा आढावा सुद्धा घेतला जात असल्याची माहिती आहे.
कागदपत्रे जमा न केल्यास
ज्या निराधार महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पैसे मिळतात. त्या महिलांनी महसूल विभागाला कागदपत्रांची योग्य माहिती दिली नाही तर त्या महिलांचे अनुदान बंद होईल.
फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद
या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे संजय गांधी योजनेचे अनुदान बंद होईल. फेब्रुवारी महिन्यापासून पडताळणी होऊ शकते.
आहेत. त्यांना नियमित अनुदान मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील अडीच कोटी बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. मात्र पैशाच्या गुंतवणुकी बद्दलबहुतांश लाडक्या बहिणींना याची माहिती नाही, त्यामुळे या मिळणाऱ्या पैशाचे नियोजन कसे करायचे याचे धडे आता सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत.? यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जात आहे. नागपूरमध्ये काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केले आणि तो प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे. यामुळे सरकारने या महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरविले आहे. काही महिला एकत्र येऊन दीड हजार रुपयातील हजार रुपये जमा करुन एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करीत आहेत. ५०-१०० लाडक्या बहिणी एकत्र येवून भिशीच्या माध्यमातून ५० हजार ते एक लाख रुपये जमा करीत आहेत.