भारतीय सरकारकडून शनिवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ५ जणांचा समावेश आहे, त्यामध्ये आर आश्विन याचे नाव आहे.
विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीने योगदान देण्याऱ्या वक्तींचा या पुरस्काराने गौरव केला जातो. पद्म हे भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी आहेत. विविध क्षेत्रांमधील २४ हून अधिक सेवाव्रतींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत
भारतीय सरकारकडून शनिवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आलीयामध्ये दोन ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा दिग्गज हॉकी गोलकिपर पीआर श्रीजेशचाही समावेश असून त्याला तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म भूषण जाहीर झाला आहे.यापूर्वी त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.आर अश्विनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्यालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने भारतासाठी १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या, तसेच ६ शतकांसह ३५०३ धावा केल्या आहेत. त्याने ११६ वनडेमध्ये १५६ विकेट्स घेतल्या असून ७०७ धावाही केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने ६५ सामने खेळले असून ७२ विकेट्स घेतल्या आहेत.
फुटबॉलपटू आयएम विजयन, पॅरा आर्चर हरविंदर सिंग आणि सत्यपाल सिंग यांनाही प पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.