Breaking
12 Apr 2025, Sat

PM Modi mahakumbh 2025 Snan: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभस्नानासाठी का निवडला ५ फेब्रुवारीचा मुहूर्त ?

PM Modi Visits Prayagraj For Kumbh Snan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभस्नानासाठी आजचा म्हणजेच ५ फेब्रुवारीचा दिवस का निवडला ? या शुभतिथीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्या.

PM Modi Takes Holy Bath In Triveni Sangam On 5th February : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यांनी आज प्रयागराज येथे कुंभ स्नानाचा अनुभव घेतला. महाकुंभ मेळ्यात पोहोचल्यानंतर, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून प्रवास केला आणि गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमस्थळी म्हणजेच त्रिवेणी संगमाला भेट दिली. तेथे त्यांनी पवित्र स्नान केले. परंतु शाही स्नानाच्या महत्वाच्या तारखा सोडून त्यांनी नेमका ५ फेब्रुवारी हाच दिवस का निवडला ? चला, जाणून घेऊया या दिवसाचे खास महत्त्व आणि मोदींनी यासाठी हा दिवस का ठरवला आहे.

जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात करोडो लोकांनी शाही स्नान केले. देश-विदेशातील मंडळींनी देखील शाही स्नान केले आहे. देशातील अनेक दिग्गज व्यक्तींनी शाही स्नान केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज, ५ फेब्रुवारीला पवित्र स्नान केले. परंतु प्रश्न असा पडतो की, पंतप्रधानांनी, मौनी अमावस्येचे सर्वात महत्त्वाचे शाही स्नान, वसंत पंचमी व इतर महत्त्वाचे स्नान सोडून, ५ फेब्रुवारी हा दिवस कुंभस्नानासाठी का निवडला? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? पुढे जाणून घेऊया…

काय आहे महत्त्व ?

 

५ फेब्रुवारीला माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी आहे. धार्मिक दृष्ट्या हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यादिवशी तपश्चर्या, ध्यान आणि साधना करणे अतिशय पुण्याचे मानले जाते. धार्मिक कथा आणि मान्यतांनुसार, महाभारत युद्धात बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्मांनी सूर्यदेवाच्या उत्तरायण काळाची आणि शुक्ल पक्षाची प्रतीक्षा केली होती.

आणि जेव्हा ही शुभ तिथी आली, तेव्हा भीष्मांनी भगवान श्रीकृष्णासमोर आपले प्राण सोडले होते, ज्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला.

शास्त्रांनुसार, माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांचे स्मरण करावे आणि त्यांच्या नावाने जल, तीळ, अक्षता, फळे आणि फुले अर्पण करावीत. असे केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि त्या व्यक्तीलाही पुण्याचा लाभ होतो. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून माघ महिन्यातील अष्टमी तिथी अत्यंत शुभआणि फलदायी मानली जाते.

 

हेच कारण आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाही स्नानाच्या इतर तिथींऐवजी ५ फेब्रुवारी ही तारीख प्रयागराजला जाऊन शाही स्नान घेण्यासाठी निवडली.Mahakumbh 2025:पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *