Pune Crime :
पूर्व वैमस्यातून सराइतांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. ३) दुपारी घडली.
पुणे – पूर्ववैमनस्यातून सराईतांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. ३) दुपारी घडली. जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
पवन सुभाष गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी, ओटा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन गवळी हा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात व्हीआयटी महाविद्यालयाजवळ उभा होता. त्यावेळी आरोपींनी पासलकर कमानीजवळ थांबलेल्या पवन गवळी याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली.
ही गोळी त्याच्या पोटात घुसून आरपार गेली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.