महायुती सरकारने पाच एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना वीजबिल माफी दिली आहे. त्यानुसार अशा सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या खात्याची बिले शून्य केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते; पण गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती पंपाच्या बिलासंदर्भात मोबाईलवर मेसेज आले आहेत.
एक ते साडेसात एचपीपर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीजबिलात महायुती सरकारने पूर्णपणे माफी दिली. त्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ लागू करून ही योजना पाच वर्षांसाठी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्याचा निर्णय झाला.