खिंडार विधानसभेचे पराभूत उमेदवार तथा जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना येथील आझाद मदैनावरील कार्यक्रमात सायंकाळी असंख्य कार्यकर्त्या सोबत प्रवेश करणार आहेत.परतूर मंठा तालुक्यातील शिवसेनेला उद्धव गटाला मोठे नुकसान.उबाठाचे पराभूत उमेदवार आसाराम बोराडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मतदार संघातील विकास कामासह पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान शेवटच्या टप्यात परतूर मंठा येथील विधानसभ निवडणुकीत उबाठा शिवसेनेकडून त्यांना प्रथमच उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यासमोर निसटता पराभव झाला. शिवसेना प्रवेशाच्या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे.