Chocolate Market India: व्हॅलेंटाईन वीक उद्या
म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी रोज डे पासून सुरू होत आहे. या दिवसांमध्ये फुलांपासून चॉकलेट आणि इतर अनेक गोष्टींची विक्री वाढते. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे असल्याने या दिवशी चॉकलेटला मोठी मागणी असते.
भारतातही चॉकलेटचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा आहे. हा व्यवसाय मागणीनुसार वेगाने वाढत आहे. नेहमी चॉकलेट्सची मागणी असते मात्र व्हॅलेंटाईन वीकमध्येच कोट्यवधी रुपयांची चॉकलेट्सची खरेदी-विक्री होते.
भारतात चॉकलेटची बाजारपेठ किती मोठी आहे ?
भारतातील चॉकलेट बाजाराचा आकार 2023 मध्ये 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 21 लाख कोटींवर पोहोचेला होता. देशभरात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची वाढ आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चॉकलेट उत्पादनांची वाढती मागणी यामुळे चॉकलेट मार्केट वाढत आहे.
एकूण बाजारपेठेत व्हाईट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचा मोठा वाटा आहे. कॅडबरी, नेस्ले, फेरेरो रोचर, अमूल, पार्ले, मार्स आणि हर्शे चॉकलेट्स हे देशातील सर्वाधिक पसंतीचे चॉकलेट ब्रँड्स आहेत.
व्हॅलेंटाईन डेला किती व्यवसाय होतो ?
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चॉकलेट व्यवसायात मोठी वाढ होते. अनेक कंपन्या या दिवशी खास चॉकलेट गिफ्ट बॉक्स बनवतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चॉकलेटची किंमत 50 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत असते.
भारतात चॉकलेटची बाजारपेठ किती मोठी आहे ?
भारतातील चॉकलेट बाजाराचा आकार 2023 मध्ये 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 21 लाख कोटींवर पोहोचेला होता. देशभरात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची वाढ आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चॉकलेट उत्पादनांची वाढती मागणी यामुळे चॉकलेट मार्केट वाढत आहे.
एकूण बाजारपेठेत व्हाईट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचा मोठा वाटा आहे. कॅडबरी, नेस्ले, फेरेरो रोचर, अमूल, पार्ले, मार्स आणि हर्शे चॉकलेट्स हे देशातील सर्वाधिक पसंतीचे चॉकलेट ब्रँड्स आहेत.
व्हॅलेंटाईन डेला किती व्यवसाय होतो ?
व्हॅलेंटाईन डेला चॉकलेट्ससोबतच गुलाबाचीही खरेदी केली जाते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चॉकलेट्सच्या खास तयारीसाठी कंपन्या हृदयाच्या आकाराच्या बॉक्समध्ये चॉकलेट्स विकतात.
नॅशनल कन्फेक्शनर्स असोसिएशन (NCA) च्या मते, यूएस मध्ये व्हॅलेंटाईन डे चॉकलेट विक्रीतून दरवर्षी अंदाजे 4 अब्ज डॉलरची कमाई होते.