IND vs ENG ODI Series: विराट कोहलीला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड ! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खऱ्या अर्थाने ‘King’ ठरण्याची संधी
highest run-scorer vs England in the ODI format: भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला वन डे सामना गुरुवारी नागपूरात खेळला जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्व लक्ष असणार आहे.
India vs England Virat Kohli Massive Record:
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेंटी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ असा शह दिल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ वन डे मालिका गाजवण्यास सज्ज झाला आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरूवात होतेय. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे आणि रोहित व विराट कोहली या सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. या मालिकेत विराटला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्याची संधी आहे. जगात आतापर्यंत एकाही फलंदाजाला इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये असा विक्रम नोंदवता आलेला नाही.
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३४० धावा केल्या आहेत आणि जर त्याने या मालिकेत ३६० धावा केल्या तर तो ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध १७०० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल. विराटने या मालिकेत २९३ धावा जरी केल्या, तरी त्याच्या नावावर विक्रम नोंदवला जाईल. इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ख्रिस गेलचा विक्रम तो मोडेल.
इंग्लंडविरुद्ध वन डेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
• ख्रिस गेल – १६३२
• कुमार संगकारा – १६२५
• सर व्हिव्हियन रिचर्ड्स – १६१९
• रिकी पाँटिंग – १५९८
• माहेला जयवर्धने – १५६२
• महेंद्रसिंग धोनी – १५४६
• युवराज सिंग – १५२३
• सचिन तेंडुलकर – १४५५
• मायकल क्लार्क – १४३०
• रॉस टेलर – १४२४
• आरोन फिंच – १३५४
• विराट कोहली – १३४०
विराटने या मालिकेत १९५ धावा केल्या, तर तो भारताकडून इंग्लंडविरुद्ध वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. महेंद्रसिंग धोनीने सध्या इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५४६ धावा केल्या आहेत.
भारताचा संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा